Pimpri: दगदग संपली, धाकधूक वाढली; शहरातील 41 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद

गुरुवारपर्यंत राहणार धाकधूक; बालेवाडीत होणार मतमोजणी

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील 18, चिंचवडमधील 11 आणि भोसरीतील 12 असे शहरातील 41 उमेदवारांचे भवितव्य आज (सोमवारी) मतपेटीत बंद झाले आहे. मतदान झाल्याने उमेदवारांची धावपळ संपली असून आता धाकधूक वाढली आहे. गुरुवार (दि. 24) पर्यंत उमेदवारांना धाकधूक राहणार आहे. गुरुवारी बालेवाडी क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आज (सोमवारी) मतदान पार पडले. शहरातील 41 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. गुरुवारी (दि. 24) मतमोजणी होणार आहे. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी क्रीडा संकुल येथे गुरुवारी होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अण्णा बनसोडे, शिवसेना-भाजप महायुतीचे गौतम चाबुकस्वार, बहुजन समाज पार्टीचे धनराज गायकवाड, बहुजन मुक्ती पार्टीचे गोविंद हेरोडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण गायकवाड, भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे संदीप कांबळे, अपक्ष अजय गायकवाड, अजय लोंढे, मुकुंदा ओव्हाळ, चंद्रकांत माने, दिपक जगताप, दिपक ताटे, नरेश लोट, बाळासाहेब ओव्हाळ, मिना यादव, युवराज दाखले, डॉ. राजेश नागोसे आणि हेमंत मोरे या 18 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 11 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे लक्ष्मण जगताप, अपक्ष राहुल कलाटे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे, बहुजन मुक्ती पार्टीचे एकनाथ जगताप, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती देसले, जनहित लोकशाही पार्टीचे नितीश लोखंडे, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर संचेती, अपक्ष डॉ. मिलिंदराजे भोसले, रवींद्र पारधे, राजेंद्र काटे या 11 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद पडले आहे.

‘भोसरी’तील 12 उमेदवारांचे भवितव्य मशिनमध्ये बंद
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे महेश लांडगे अपक्ष विलास लांडे, बहुजन समाज पार्टीचे पवार राजेंद्र आत्माराम, जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास गजरमल, समाजवादी पार्टीच्या वहिदा शेख, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख, वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख, छाया जगदाळे, हरेश डोळस, भाऊ अडागळे, मारुती पवार आणि ज्ञानेश्वर बो-हाटे या 12 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.