Pimpri : कपड्याच्या दुकानातून सव्वादोन लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 24) पहाटे अजमेरा कॉलनी, पिंपरी येथे उघडकीस आली.

संभाजी धनराज मोरे (वय 36, रा. वास्तू उद्योग कॉलनी, अजमेरा, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे यांचे अजमेरा कॉलनीमध्ये वैष्णवी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास मोरे यांनी नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद केले. त्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. गल्ल्यात ठेवलेली दोन लाख 15 हजारांची रोकड चोरून नेली. शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.