Pimpri : देशापुढे मेंदूच्या हुकूमशाहीचा धोका -प्रा. तेज निवळीकर

एमपीसी न्यूज – संविधानाला मोडकळीस आणण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता काही शक्ती मेंदूच्या हुकूमशाहीने आपला अजेंडा पूर्ण करीत असल्याची चिंता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे निवृत्त प्राध्यापक तेज निवळीकर यांनी आज येथे व्यक्त केली.

पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, संविधान दिन सोहळा समिती, पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व बसव समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजित भारतीय संविधान जनजागरण अभियानाच्या १५ व्या व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास अभ्यास प्रा. सोमनाथ गोडसे होते.

  • चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ॲड. मनिषा महाजन, बसव समितीचे बसवराज कनजे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. निवळीकर म्हणाले, परिवर्तनाची फार मोठी लढाई आता लढावी लागणार असून आगामी काळात चळवळीतील व पुरोगामी विचारधारेतील मंडळींनी विचार, निर्णय आणि कृती म्हणजे परिवर्तन या कार्यक्रमाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

  • यावेळी प्रा. गोडसे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ज्ञानदेव रणसुरे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या ॲड. मनिषा महाजन, बसव समितीचे बसवराज कनजे यांनी केले तर संजय उबाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी प्रा. पांडुरंग वाघमारे, संजय उबाळे, विजय गेडाम, विजय जगताप, बसवराज कनजे, ॲड. रमेश महाजन यांनी पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.