Pimpri: तीन उमेदवारांनी निवडणूक खर्च दडविला, निवडणूक विभाग बजावणार नोटीस

केवळ 15 उमेदवरांनी सादर केला निवडणुकीचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांनी निवडणूक खर्च दडविला आहे. तिघांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा दैनंदिन खर्च सादर केला नाही. त्यामुळे या तीन उमेदवारांना निवडणूक विभाग नोटीस बजाविणार आहे. दरम्यान, मतदारसंघातील उर्वरित 15 उमेदवरांनी निवडणुकीचा खर्च सादर केला आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच उमेदवारांच्या खर्च मोजायला सुरुवात होत असते. पिंपरी विधानसभा मतदारसंघात 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज भरल्यापासून प्रचार संपेपर्यंत प्रत्येक दिवशी केलेल्या खर्चाचा हिशोब उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो. त्यासाठी, अर्ज दाखल केल्यानंतरच निवडणूक विभागाच्या वतीने उमेदवारांना खर्चा मांडण्यासाठी नोंदवही दिलेली असते. नोंदवहीची तपासणी शुक्रवारी (दि. 11) निवडणूक खर्च निरीक्षकांकडून करण्यात आली.

खर्च नोंदवही तपासणीच्यावेळी अपक्ष उमेदवार युवराज दाखले, चंद्रकांत माने, मुकुंदा ओव्हाळ हे तीन अपक्ष उमेदवार अनुपस्थित होते. त्यांनी अद्याप पहिल्या टप्प्यातील खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. उमेदवारांना दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात 15 आणि 19 ऑक्टोबर रोजी देखील दैनंदिन खर्च सादर करावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.