Pimpri : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळला

एमपीसी न्यूज – चालकाचे नियंत्रण सुटल्याने अवजड मालवाहतूक ट्रक बीआरटी आणि सर्व्हिस रोडच्या दुभाजकावर आदळला. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळी पिंपरी येथे घडली असून यात कोणीही जखमी झालेले नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अवजड मालवाहतूक ट्रक (एपी 04 / वाय 9786) निगडीकडून पुण्याकडे जात होता. पिंपरी मोरवाडी येथे ट्रक आला असता चालकाचे नियंत्रण सुटले.

  • बीआरटी आणि सर्व्हिस रोडच्या मधल्या दुभाजकावर ट्रक आदळला. दुभाजक तोडून ट्रक बराच अंतर पुढे गेला. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत कोणीही जखमी नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.