Pimpri : खरा देव माणसांमध्येच आहे – संस्कृती गोडसे

एमपीसी न्यूज – माणसांमध्येच खरा देव आहे, असे मत मातृसेवा सेवाभावी संस्थेच्या व्यवस्थापिका संस्कृती गोडसे यांनी व्यक्त केले. मातृसेवा सेवाभावी संस्थेमध्ये गणेश आरतीचे आयोजन करण्यात येते. यावेळी त्या बोलत होत्या.

संस्कृती गोडसे या अवघ्या लहान वयात ही सेवा स्वीकारुन अगदी आनंदाने त्या करत आहेत. एका घरात दोन गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होत नाही म्हणून घरातील गणेशमूर्ती आणि एक फोटो ठेवून सजावट करुन सर्व रुग्णांना घेऊन पूजा करत आहेत तसेच ती सजावट आणि गणेशाची पूजा कायम केली जाईल, अशी ग्वाही संस्कृती गोडसे यांनी दिली. दररोज एका व्यक्तीच्या हस्ते आरती केली जाते.

यावेळी संस्कृती म्हणाल्या, मी खूप पुण्य केले नाही, पण इतकं नक्की केलंय की देवाने मला माझ्या आयुष्यात खूप माणसे दिली आहेत. त्यांची सेवा करण्याचे भाग्य मला आणि माझ्या कुटुंबीयांना मिळाले आहे.  ही संस्था गेली 12 वर्षांपासून गोडसे कुटुंबीय चालवत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.