Pimpri: ‘मास्क’चा 100 टक्के वापर हा एकप्रकारचा लॉकडाउनच – आयुक्त हर्डीकर

The use of 100 percent masks is a kind of lockdown - Commissioner Hardikar 'सगळ्या प्रश्नांचा विचार करुन लॉकडाउनबाबत निर्णय घेतला जाईल'

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 100 टक्के नागरिकांनी मास्क वापरला,  सुरक्षित अंतर राखले, सातत्याने हात धुणे याचे व्यवस्थित पालन केले. तर, तो 80 टक्के लॉकडाउनच आहे. नियमांचे पालन केल्यास हा एकप्रकारचा लॉकडाऊनच होईल.  त्यामुळे शहरवासीयांनी नियमांचे पालन करावे असे कळकळीचे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. शहरात रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे लॉकडाउन करण्याची मागणी केली जात आहे. लोकप्रतिनिधींची भावना निश्चितपणे गंभीर आहे. सगळ्या प्रश्नांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून लॉकडाऊन वाढविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्याबाबत ‘एमपीसी न्यूज’ने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी आयुक्त हर्डीकर म्हणाले,  लॉकडाउनचा निर्णय  सोपा नाही. अनेक प्रश्न आहेत. केवळ पिंपरी-चिंचवडसाठी निर्णय घेता येणार नाही. पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीणसाठी एकत्रित लॉकडानचा निर्णय घ्यावा लागेल. तरच त्याला अर्थ आहे.

कारण अर्धे लोक शहरातून ग्रामीण भागात कामाला जातात. चाकण, तळेगाव दाभाडे, हिंजवडीत जातात. पुण्यातील खूप लोक पिंपरी-चिंचवड शहरात कामासाठी येतात. यामुळे उद्योगधंदे चालू की बंद ठेवणार,  या सगळ्या प्रश्नांचा विचार करुन निर्णय घेतला जाईल. सगळ्यांची भावना निश्चितपणे गंभीर आहे. शहरात रुग्णसंख्या वाढतेय.

रुग्णसंख्या वाढीला आपणच कुठे ना कुठे जबाबदार आहोत. त्यासाठी नागरिकांनी गरज नसेल. तर, घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर केला. तर हा एकप्रकारचा लॉकडाऊनच आहे. 100 टक्के लोकांनी बाहेर जाताना-येताना मास्क वापरला. तोंडावर, नाकावर मास्क कायम ठेवला. तर तो किमान 80 टक्के लॉकडाउनच आहे. त्यासोबत वारंवार हात धुतले. तर, 100 टक्के लॉकडाउन असल्यासारखाच त्याचा अर्थ आहे. पण, आजही अनेक नागरिक मास्कचा वापर कराताना दिसत नाहीत. लोक बाहेर जाऊन मास्क गळ्यात ठेवतात. वापरत नाहीत. तरुण मुले मास्क वापरत नाहीत.

रस्त्यावर सातत्याने थुंकतात. हे जोपर्यंत थांबत नाही. तोपर्यंत तुम्ही लॉकडाउन करुनही प्रसारच करणार आहात. मग, लॉकडाउन करण्याचा हेतू काय आहे. प्रत्येकाने स्वत:ची, आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे. नियमांचे उल्लंघन करुन ती घ्यायला तयार नसाल तर उपयोग काय आहे. जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला व्हायला पाहिजे, असेही आयुक्त हर्डीकर म्हणाले.

गुरुवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू पाळावा

गुरुवारी आणि रविवारी जनता कर्फ्यु पाळावा. ज्याला कोणतेही काम नाही. त्यांनी घराच्या बाहेर पडू नये. ज्या दुकानदारांना दुकाने बंद करणे शक्य आहे. त्यांनी बंद करावीत. गुरुवारी, रविवारी बरेच उद्योग बंद असतात.  ज्यांना शक्य नाही. त्यांनीही उद्योग धंदे बंद ठेवावेत. यापद्धतीने गेलो. तर, रस्त्यावरील जास्तीत-जास्त गर्दी कमी होईल, असेही आयुक्त हर्डीकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.