Pimpri : स्पाईस जेट कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणीची हजारोंची फसवणूक

एमपीसी न्यूज – स्पाईस जेट कंपनीत पुणे विमानतळावर नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका तरुणीची 46 हजार 200 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 22 एप्रिल ते 2 मे या कालावधीत काळभोरनगर, चिंचवड येथे घडला.

स्वस्ती पवन चतुर्वेदी (वय 22, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार करण (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावर स्पाईस जेट या विमान प्रवासी कंपनीत नोकरी लावण्याचे अमिश दाखवले. नोकरीसाठी ड्रेस, व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, कन्फर्मेशन लेटर देण्यासाठी करण याने स्वस्ती यांच्याकडून विनोद नावाच्या बँक खात्यावर सुमारे 46 हजार 200 रुपये भरण्यास सांगितले.

पैसे भरून देखील नोकरी दिली नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.