BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : लोहमार्ग ओलांडणा-या महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – लोहमार्ग ओलांडत असताना भरधाव रेल्वेखाली सापडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.19) सकाळी साडेदहाच्या सुमारास दळवीनगर झोपड्पट्टीजवळ लोहमार्गावर घडली.

कुसुमबाई लक्ष्मण जोगदंड (वय 62, रा.दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगदंड या दळवीनगर झोपडपट्टी परिसरात राहतात. मंगळवारी सकाळी घराजवळच असणाऱ्या लोहमार्गावरून पलीकडे जात होत्या. दरम्यान भरधाव वेगात आलेल्या अज्ञात रेल्वेने त्यांना उडवले.

यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ऐकू येत नव्हते. यामुळे रेल्वेचा आवाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चिंचवड लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3