Pimpri : महिला सक्षमीकरणासाठी महिला आयोगाचा ‘वारी नारी शक्ती’चा उपक्रम

एमपीसी न्यूज – वारकरी संप्रदायाची परंपरा चालत आलेली पंढरपूर वारी देहू ते पंढरपूर मार्गावर जगतगुरू संततुकाराम महराज यांच्या पालखी मार्गावर तसेच आळंदी ते पंढरपूर या मार्गावर संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मार्गावर महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत दोन्ही मार्गावर महिला आयोगातर्फे महिलांसाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहट्कर यांच्या संकल्पनेतून महिलांना प्रबोधन करण्याचा नवीन उपक्रम वारी ‘नारी शक्ती’ची राबविण्यात येत आहे.
.
लोणी काळभोर, यवत येथे पिंपरी-चिंचवड येथील स्वीकृत नगरसेविका वैशाली खाड्ये यांच्या नेतृत्वाखाली आषाढी वारीमध्ये वारकरी महिलांना महिला आयोगाची महिती देण्यात आली.

  • वारकरी महिलांना आरोग्य सेवा देण्यात आली. तसेच महिलांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी आणि महिलांचे हक्क कायदे यांविषयीची पत्रके देण्यात आली.

यावेळी युवा मोर्चा शहर उपाध्यक्षा श्रध्दा केसकर, दीक्षा राणे,सुजाता चितळे, मनीषा कुलकर्णी, स्नेहल देशपांडे, मनीषा पारंदे, युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी सरचिटणीस रुतीक चव्हाण, अमोल दामले, यश, जीवन माने यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून सेवा दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.