Pimpri : निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी दाम्पत्यास यशवंत-वेणू पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे होणार सन्मान

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने यावर्षीच्या यशवंत – वेणू सन्मानासाठी निवृत्त विभागीय आयुक्त
चंद्रकांत दळवी आणि त्यांच्या पत्नी पद्मा दळवी यांची निवड करण्यात आली आहे. राळेगणसिध्दी येथे येत्या रविवारी (दि. 17) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा रंगणार आहे. अशी माहिती पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली. 

चिंचवडचे ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे तर स्वागताध्यक्ष म्हणून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे उपस्थित राहणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कारासाठी शिरूर तालुक्‍यातील करंजी गावचे किरण ढोकले यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार देऊन, जुन्नर तालुक्‍यातील राजुरी गावातील शरदचंद्र नागरी सहकारी पतपेढीला यशवंतराव चव्हाण सहकार भूषण पुरस्काराने आणि भोसरीतील भूगोल फाउंडेशनचे विठ्ठल वाळूंज यांना यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे युवा अकादमी पुरस्कारप्राप्त फेसाटी कादंबरीला बळीवंश पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. याप्रसंगी बाजीराव सातपुते हे ‘देवराष्ट्र ते महाराष्ट्र’ या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.

या सोहळ्याच्या सहयोगी संस्था नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी, लायन्स क्लब ऑफ पुणे, भोजापूर गोल्ड, आशिया मानवशक्ती  विकास संस्था यांच्या सहयोगाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1