Pimpri: डेंटल क्लिनिकमध्ये चोरी, 10 हजारांचा ऐवज लंपास

Pimpri: Theft at dental clinic, Rs 10,000 stolen फिर्यादी डॉ. सुरभी यांचे साई चौक येथे मधुबन हाऊसिंग सोसायटी येथे मागू डेंटल क्लिनिक आहे. 1 ऑगस्ट रोजी फिर्यादी यांनी त्यांचे क्लिनिक रात्री बंद केले.

एमपीसी न्यूज – पिंपरीतील साई चौक येथील एका डेंटल क्लिनिकचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. क्लिनिकमधून लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 2 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली असून याबाबत 6 ऑगस्ट रोजी फिर्याद देण्यात आली आहे.

डॉ. सुरभी संजय मागू (वय 27, रा. मधुबन हाऊसिंग सोसायटी, साई चौक, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. सुरभी यांचे साई चौक येथे मधुबन हाऊसिंग सोसायटी येथे मागू डेंटल क्लिनिक आहे. 1 ऑगस्ट रोजी फिर्यादी यांनी त्यांचे क्लिनिक रात्री बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी क्लिनिकचे शटर वरच्या बाजूला वाकवून आत प्रवेश केला.

आतमधून एक लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण 10 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. 2 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. मात्र, याबाबत 6 ऑगस्ट रोजी फिर्याद देण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.