Pimpri : चिखली, पिंपरी आणि चाकण परिसरातून पाच लाखांच्या वाहनांची चोरी; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी परिसरातून 60 हजारांच्या तीन मोटारसायकल चोरून नेल्या आहेत. तर चाकण आणि चिखली परिसरातून साडेचार लाखांच्या ट्रक व टेम्पो चोरून नेले आहेत. याबाबत सोमवारी (दि. 27) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पहिल्या प्रकरणात मनोज भालचंद्र नाईक (वय 42, रा. बोपोडी) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाईक यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 14 / डी झेड 3443 ही मोटारसायकल 25 जानेवारी रोजी दुपारी पावणेरेएकच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा दुचाकी चोरून नेली.

दुस-या प्रकरणात संजय रुपचंद पाटील (वय 47, रा. चिंचवड गाव) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची एम एच 14 / जी टी 8891 ही दुचाकी 25 जानेवारी रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास पिंपरी भाजी मार्केटमध्ये लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

तिस-या प्रकरणात अजिंक्य सुदर्शन जाधव (वय 19, रा. पिंपरी) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजिंक्य यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची एम व्ही यु 1131 ही दुचाकी 25 जानेवारी रोजी दुपारी साडेपाच वाजता लॉक करून पिंपरी येथील डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज समोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. वरील तिन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

रस्त्याच्या बाजूला पार्क केलेला ट्रक पळवल्याची घटना चाकण परिसरात कुरुळी येथे भारत फोर्स कंपनीच्या गेट समोर 27 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी मधुकर मारुती भोसले (वय 58, रा. हडपसर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले यांच्याकडे अडीच लाख रुपये किमतीचा ट्रक आहे. तो ट्रक त्यांनी 25 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कुरुळी येथे रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केला. अज्ञात चोरट्यांनी त्यांचा ट्रक चोरून नेला. हा प्रकार 27 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

रस्त्याच्या बाजूला पार्क केलेला 2 लाख रुपये किमतीचा टेम्पो चोरटयांनी पळवून नेल्याची घटना २२ जानेवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे उघडकीस आली. याप्रकरणी मोहम्मद उर्फ अब्दुल जब्बार चौधरी (वय 48, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी मंगळवारी (दि. 28) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांनी 21 जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांचा टेम्पो चिखली- कुदळवाडी रोडवरील पेट्रोल पंपाच्या बाजूस पार्क केला होता. दरम्यान, चोरटयांनी तो चोरून नेला. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.