Pimpri : … तर वाहनांचा परवाना रद्द करुन फौजदारी गुन्हा दाखल करणार

महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज – शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी नदीच्या ( Pimpri) काठावर मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जात आहे. बांधकामांचा राडारोडा नदीमध्ये मिसळल्याने मोठ्या प्रमाणावर नद्यांचे प्रदूषण होत आहे. अशा प्रकारे नदी किनारी भराव टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही काही नागरिक नदीपत्रात राडारोडा टाकत आहेत. राडारोडा टाकताना वाहन आढळल्यास संबंधित वाहनांचा परवाना रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिला आहे.

Medicine Price : औषधांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाल्याचा दावा चुकीचा; 54 औषधांमध्ये 0.01 पैसा वाढ

पिंपरी-चिंचवड शहरामधून पवना, मुळा व इंद्रायणी या नद्या वाहतात. गेल्या काही ( Pimpri) वर्षांपासून नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नद्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक पाणी मिसळले जाते, तसेच अनेक नाले नद्यांना मिळत असल्याने त्यामध्ये दूषित पाणी मिसळते. त्यामध्येच भर म्हणून शहरातील काही बांधकाम व्यावसायिक बांधकाम राडारोडा टाकत असल्याचे निदर्शनास आले. अनेकांनी असा भराव टाकून शेड उभारले आहेत, तसेच बांधकाम केले आहे. त्यामुळे नदीमध्ये माती व सिमेंट मिसळून नदीचे प्रदूषण होत आहे.

याबाबत सह शहर अभियंता कुलकर्णी म्हणाले, नदीच्या काठावर तसेच नदीमध्ये भराव टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. सध्या दंड करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्याही पुढे आता वाहन जप्त करून त्या वाहनाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. ते वाहन संबंधित मालकाला पुन्हा वापरता येणार ( Pimpri)  नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.