Pimpri: जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याचे पास घेताना अडचण येतेय, ‘या’ नंबरवर संपर्क साधा 

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा पाठपुरावा करणा-या व्यापा-यांना पोलिसांकडून पास देण्यात येत आहेत. व्यापा-यांना पास घेताना कही अडचण येत असल्यास व्यापारी असोसिएशनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी पदाधिका-यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. 

जीवनावश्यक वस्तू वितरकांना पासेस देण्याची सुविधा पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे. पोलीस यंत्रणेकडून पासेस मिळण्यासाठी परिमंडल अधिकारी -1 पोलीस उपायुक्त स्मिता पाटील व परिमंडल -2 पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे  यांच्याशी संपर्क साधावा.

तसेच कोणतीही अडचण भासल्यास व्यापा-यांनी  व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष  गजानन बाबर   8600110002, गोविंद पानसरे  9422014044, विजय गुप्ता 9822448519 आणि श्याम मेघजानी  9552263555 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. व्यापाऱ्यांनी नागरिकांना घरपोच किराणामाल ,जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी तसेच गर्दी होणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनी अध्यक्ष बाबर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.