Pimpri: शहरात बारा दिवसात एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही; 1533 होम क्वारंटाईन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील बारा दिवसामध्ये एकही नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. तर, 12 पॉझिटीव्ह रुग्णापैकी 10 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित दोघांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, परदेशातून आलेले 1533 होम क्वारंटाईन असून महापालिकेने पाच लाख 76 हजार 918 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 307 व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आज अखेर 253 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच  आज 41 व्यक्तींना नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

राज्य शासनामार्फत दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरातील उद्रेकाच्या अनुषंगाने तबलीग जमातीच्या बंगलेवाली मशिद, नवी दिल्ली या ठिकाणी धार्मीक कार्यक्रमांत सहभागी झालेल्या नागरीकांपैकी पिंपरी-चिंचवड मधील एकुण 33 नागरीकांची माहिती पाठविण्यात आलेली आहे. त्यापैकी एकुण 23 नागरीक व त्यांचे 5 नातेवाईक असे एकुण 28 संशयितांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालय याठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.