Pimpri : दिवसभरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही; 43 हजार नागरिकांचे सर्वेक्षण; 2155  होम क्वारंटाईन

881 पैकी 790 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह : 59 जणांचे अहवाल प्रलंबित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आजअखेरपर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या 881 पैकी 790 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 59 जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहे. तर, 2 हजार 155 जणांना  होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिवसभरात 43 हजार 804 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात आजपर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय  22 रुग्णांपैकी 19 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम तर तीन रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि.9) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 881  व्यक्तींचे कोरोना तपासणीकरीता घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आजअखेर 790  व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच आज (सोमवारी) 59 संशयितांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आजपर्यंतची संख्या 2155 झाली आहे. या सर्वांनी किमान 14  दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28  दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. महापालिकेच्या 160 कर्मचा-यांच्या टीमने घरोघरी जाऊन शहरातील कन्टेंनमेंट झोन मधील 43 हजार 804 नागरिकांचे दैनंदिन सर्वेक्षण केले आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 59

#पॉझिटीव्ह रुग्ण – 00

#निगेटीव्ह रुग्ण – 60

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 59

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 78

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 38

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 35

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 22

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  1

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 12

# दैनंदिन भेट दिलेल्या घरे – 14364

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 43804

# आजपर्यंतची होम क्वारंटाईन नागरिकांची संख्या – 2155

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.