Pimpri: ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील आणखी एक ‘कोरोना पॉझिटीव्ह’

साडेसात लाख नागरिकांचे सर्वेक्षण, 1873 होम क्वारंटाईन

एमपीसी न्यूज -पिंपरी चिंचवड शहरात गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज ( बुधवारी) रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील पुरुष रुग्णाचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे.

दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमातून शहरात आलेल्यांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (दि.2) स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एकाला शुक्रवारी (दि.3) कोरोनाची लागण झाली. त्यानंतर शनिवारी (दि.4) एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये दिल्लीतून आलेल्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील चार जण होते. त्यानंतर आज बुधवारी (दि. 8) त्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. हा रुग्ण पुरुष आहे.

दरम्यान, शहरात आजपर्यंत 20 रुग्ण आढळले होते. त्यापैकी बारा बरे झाले आहेत. आठ बाधित रुग्णांवर वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु होते. त्यामध्ये आज आणखी एकाची भर पडली आहे. त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या नऊवर पोहचली आहे.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 5,8, 7५८७ व्यक्तींचे घशातील द्रावांचे नमुने कोरोना तपासणीकरिता  एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आजअखेर 541 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरित अहवाल प्रलंबित आहेत. तसेच आज (बुधवारी) 26 कोरोना संशयितांना वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत.
शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आजपर्यंतची संख्या 1873 आहे.  या सर्वांनी किमान 14  दिवसांसाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28 दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.

आजचा अहवाल

दाखल झालेले संशयित रुग्ण – 26

पॉझिटीव्ह रुग्ण – 1

निगेटीव्ह रुग्णांची संख्या – 32

चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण संख्या – 26

रुग्णालयात दाखल रुग्ण – 34

डिस्चार्च झालेले रुग्ण – 34

सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 7 लाख 47 हजार 249

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.