Pimpri: शहरातील ‘ही’ 29 ठिकाणे  ‘कंटेन्मेंट’ झोन; तर ‘हे’ 15 भाग ‘कंटेन्मेंट’ झोनमधून बाहेर

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने  पिंपरी-चिंचवड शहरातील काही परिसर आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून ‘कंटेन्मेंट’  झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केला जातो. तर, रुग्ण नसलेला भाग कंटेन्मेंट मधून वगळला जातो. त्यापैकी 15 ठिकाणे ‘कंटेन्मेंट’ झोनमधून बाहेर आली आहेत. म्हणजे या भागात आता कोरोनाचे  सक्रिय रुग्ण नाहीत. तर, शहरातील 29 ठिकाणे  ‘कंटेन्मेंट’ झोनमध्ये आहेत. या भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद असून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे.

कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 19 ते 27 एप्रिल दरम्यान संपुर्ण पिंपरी-चिंचवड शहर ‘कंटेन्मेंट’ झोन (प्रतिबंधिक क्षेत्र) म्हणून घोषित केले होते. त्यानंतर रुग्ण वाढीचा दर कमी झाल्याचे सांगत शहरातील काहीच भाग ‘कंटेन्मेंट’ झोन म्हणून जाहीर केले. त्यानंतर ज्या भागात रुग्ण वाढतील तो भाग  ‘कंटेन्मेंट’ झोन घोषित केला जात आहे. महापालिकेने शहरातील  ‘कंटेन्मेंट’ झोन आणि ‘कंटेन्मेंट’ झोन मधून बाहेर पडलेल्या भागाची सविस्तर माहिती असलेला नकाशा  प्रसिद्ध केला आहे.

शहरातील ‘ही’ 29 ठिकाणे आहेत ‘कंटेन्मेंट’ झोन!

पिंपरीवाघेरे तपोवन रोड,  खराळवाडी, कासारवाडीतील रामराज्य प्लॅन्ट,  नेहरुनगर बसडेपो, दापोडीतील गणेशनगगर, चिंचवडमधील मोहननगर, पिंपळेगुरवतील जगताप कॉम्पलॅक्स, शिवनेरी कॉलनी, विनायकनगर, पिंपळेसौदागरमधील शुभश्री गृहनिर्माण सोसायटी, पिंपळेनिलख येथील शिवाजी चौक, जुनी सांगवीतील मधुबन सोसायटी, वाकड येथील कावेरीनगर पोलीस लाईन, थेरगावातील 16 नंबर बसस्टॉप, चिंचवडमधील इंदरानगर, काळेवाडी,

भोसरीतील पीएमटी चौक, गुरुदत्त कॉलनी, शास्त्रीचौक,  च-होलीतील तनिष्क ऑर्चिड, साठेनगर, रुपीनगर, तळवेडीतील न्यु अँगल स्कूल,  मोशीतील गंधर्वनगरी, बनकर वस्ती, वुड्स विला, दिघीतील विजयनगर, तनिष्क आयकॉन,  संभाजीनगर येथील बजाज स्कूल परिसर हा भाग  ‘कंटेन्मेंट’ झोन मध्ये आहे. या परिसरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद असून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे.

‘कंटेन्मेंट’ झोन मधून ‘ही’ 15 ठिकाणे बाहेर!

पुनावळेतील कुंभार गल्ली, ओव्हाळवस्ती, ताथवडे चौक, जीवननगर, भोसरीतील खंडोबा माळ, आदिनाथनगर, पिंपळेसौदागर, मोशीतील नागेश्वरनगर, थेरगावातील शिवतेजनगर, पडवळनगर, क्रांतीवीरनगर,  गणराज कॉलनी, चिखलीतील घरकूल, दिघीतील बी.यू.भंडारी, रोडे हॉस्पीटल आणि संभाजीनगर हा भाग  ‘कंटेन्मेंट’ झोन मधून बाहेर आला आहे. या परिसरात आता कोरोनाचे सक्रिय रुग्ण नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.