Pimpri : श्रीरंग बारणे यांच्या पडद्यामागच्या शिलेदारांनी पवार रणनितीवर केली मात

श्रीरंग बारणे यांच्या विजयात 'बॅकहॅन्डटीम'चा सिहाचा वाटा

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार श्रीरंग बारणे तब्बल दोन लाख 17 हजार 763 मतांनी विजयी झाले आहेत. पवार घराण्यातील पहिला पराभव करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. त्यांच्या या विजयात त्यांच्या ‘बॅकटीम’चा सिहाचा वाटा आहे. पवार रणनितीवर बारणेंच्या शिलेदरांनी मात केली.

पडद्यामागे राहून शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, पिंपरी विधानसभा प्रमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, रवी नामदे, महिला शहरसंघटिका उर्मिला काळभोर, धनाजी बारणे, बशीर सुतार, यांनी रात्रीचा दिवस आणि उन्हाची परवा न करता प्रचार केला. त्यांच्या या प्रचाराला यश आला. त्यांच्या या कष्टाचे फळ आले आहे.

श्रीरंग बारणे यांच्या विरोधात पार्थ पवार उभे होते. दस्तरखुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली होती. बारणे यांच्या शिलेदारांनी देखील अतिशय योग्य रणनिती आखली. सूक्ष्म नियोजन केले. त्यानुसार प्रचार यंत्रणा राबविली. प्रचारात सुसुत्रता ठेवली. प्रचार रॅली, पदयात्रा, सभांचे योग्य नियोजन केले. रात्रीचा दिवस करुन, एकदिलाने प्रचार केला.

या शिलेदारांच्या रणनितीसमोर पवार रणनिती देखील सपशेल फेल ठरली. बारणे यांचा तब्बल दोन लाख 17 हजार 763 मताधिक्याने विजय झाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मताधिक्याने बारणे निवडून आले. बारणे यांच्या विजयाने शिवसेनेने हॅटट्रिक करत मावळवर भगवा फडकाविला. तर बारणे सलग दुस-यावेळी निवडून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.