Pimpri : घरातील व्यक्ती मतदानाला जाताच चोरट्याने फोडले घर; चोरटा जेरबंद

एमपीसी न्यूज – घरातील व्यक्ती मतदान करण्यासाठी गेल्यानंतर बंद असलेले ( Pimpri ) घर एका चोरट्याने फोडले. घरातून दोन लाख 37 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 13) दुपारी तीन ते पावणे चार वाजताच्या दरम्यान उद्यमनगर, पिंपरी येथे घडली. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अवघ्या बारा तासात अटक केली.

रोहन राणोजी शिंदे (वय 23, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 13) मतदान झाले. उद्यमनगर, पिंपरी मधील श्रुती एन्क्लेव्ह या सोसायटीत राहणारे दीपक मुरलीधर वाघमारे हे दुपारी तीन वाजता त्यांच्या घराला कुलूप लाऊन मतदान करण्यासाठी गेले. ते पावणे चार वाजताच्या सुमारास मतदान करून परत आले असता त्यांच्या घराचे कुलूप तुटलेल्या स्थितीत होते. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या घरातून सोन्याचे 32 ग्रॅम दागिने, स्मार्टवॉच व दोन मोबाईल हँडसेट असा एकूण दोन लाख 37 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे आढळले.

Chikhali : चिखलीतील ‘तो’ गोळीबार व्यावसायिक वादातून; तिन्ही आरोपींना अटक

वाघमारे यांनी तत्काळ पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ तपासाला सुरुवात केली. रेकोर्डवरील आरोपी रोहन शिंदे याने हा गुन्हा केल्याचे पोलीसंनी निष्पन्न केले. पोलिसांनी रोहन शिंदे याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेला दोन लाख 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रोहन शिंदे हा पोलीस रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी वाहन चोरी, इतर मालमता चोरीचे गुन्हे ( Pimpri ) दाखल आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.