Pimpri : चोरट्याने पिंपरी-चिंचवड शहरातून पाच वाहने पळविली; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी, आळंदी, तळेगाव दाभाडे, देहूरोड आणि सांगवी परिसरातून पाच वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाच घटनांमध्ये एकूण एक लाख 65 हजार रुपयांची वाहने चोरीला गेली आहेत.

पहिली घटना वडमुखवाडी येथे आंबा स्टॉप जवळ 7 जानेवारी रोजी उघडकीस आली. अक्षय बाळासाहेब काळोखे (वय 27, रा. वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस पाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळोखे यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची एम एच 14 / ई आर 7724 ही दुचाकी वडमुखवाडी येथे आंबा स्टॉप जवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

दुसरी घटना केळगाव येथे कृष्णाई कॉम्पलेक्स समोर 23 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. सदबा पंढरी केंद्रे (वय 29, रा. केळगाव. मूळ रा. लातूर) यांनी आळंदी पोलीस पाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केंद्रे यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची एम एच 26 / बी पी 8364 ही दुचाकी कृष्णाई कॉम्प्लेक्स समोर 22 फेब्रुवारी रोजी रात्री पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

तिसरी घटना बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये 2 मार्च रोजी घडली. रोहित अशोक माळी (वय 21, रा. शेलारवाडी, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस पाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माळी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची डी 14 / ए 0707 ही दुचाकी बेगडेवाडी रेल्वे स्टेशन येथे तिकीट घराजवळ सकाळी पार्क केली. दुपारी एक वाजता दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

चौथी घटना विठ्ठलवाडी देहूगाव येथे 27 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. दत्तात्रय तुकाराम सावंत (वय 47, रा. चिंबळी, ता. खेड) यांनी देहूरोड पोलीस पाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची एम एच 14 / डी डी 8088 ही दुचाकी 26 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता विठ्ठलवाडी देहूगाव येथे पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 27 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

पाचवी घटना साठ फुटी रोड, पिंपळे गुरव येथे 26 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. राहुल प्रभाकर कांबळे (वय 39, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांनी त्यांचे 80 हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन 20 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता पिंपळे गुरव येथील साठ फुटी रोडच्या कडेला पार्क केले. अज्ञात चोरट्यांनी त्यांचे वाहन चोरून नेल्याचे 26 फेब्रुवारी रोजी उघडकीस आले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.