Pimpri : चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून 80 हजार रुपयांचा ऐवज चोरला

एमपीसी न्यूज – दरवाज्याची कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना संत तुकारामनगर, पिंपरी येथे मंगळवारी (दि. 15) पहाटे घडली.

प्रणव दिलीप पांडे (वय 29, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी गुरुवारी (दि. 17) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी साडेचार ते मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान पांडे यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आतील 50 हजाराचा एक लॅपटॉप आणि 30 हजार रुपयांचा कॅमेरा असा एकूण 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.