BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी दोन मोबाईल चोरले; गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याची शक्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यात हद्दीत दोन मोबाईल फोन चोरीच्या घटना घडल्या. दोन्ही घटना बाजाराच्या ठिकाणी घडल्या असून चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याचे समोर आले आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीचा प्रकार घडला. मोहन लक्ष्मणराव देशपांडे (वय 50, रा. लिंक रोड, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फायरडी मोहन रविवारी (दि. 1) रात्री साडेसातच्या सुमारास फुल मार्केट पिंपरी येथे गेले. तिथे अज्ञात चोरट्यांनी त्यांचा सुमारे 17 हजार 500 रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेला. याचा पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

तर, चिंचवडमधील भाजी मंडई येथे आणखी एक मोबाईल चोरीचा प्रकार घडला. याप्रकरणी कौस्तुभमणी श्रीवत्सलांचन कट्टी (वय 41, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कौस्तुभमणी रविवारी (दि. 1) दुपारी चिंचवड भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांचा सुमारे 15 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3