Pimpri : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरटयांनी लांबविले दागिने अन् मोबाईल

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने आणि मोबाईल चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत रविवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या प्रकरणात सविता अशोकराव काटकर (वय 62, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काटकर निगडीतील भक्तीशक्ती चौक ते आकुर्डी खंडोबा माळ दरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होत्या. त्या निगडी येथील पीएमपीच्या बसथांब्यावरून बसमध्ये चढत असताना त्यांच्या हातातील 20 ग्रॅम सोन्याची 19 हजारांची बांगडी चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या प्रकरणात अनुराधा रोहीत भोईटे (वय 30, रा. स्पाईन रोड, चिखली प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुराधा भोईटे त्यांच्या कुटुंबासह शिरगाव येथे जात होत्या. त्यासाठी निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलालगतच्या बसथांब्यावरून निगडी ते वडगाव बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या पर्समधील हॅण्डपर्समधील 10 हजारांचा मोबाइल, 600 रुपयांची रोकड, आधार कार्ड, डेबीट कार्ड व क्रेडीट कार्ड चोरून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.