BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : वायसीएमएचमध्ये होणार तिसरा आयसीयू विभाग

0 179
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) 25 खाटांचा तिसरा अत्याधुनिक सोयींयुक्त अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला जाणार आहे. यामुळे चिंताजनक रुग्णांवर तत्काळ उपचार करणे सोईचे होणार आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

.

पिंपरी महापालिकेचे संत तुकारामनर येथे वायसीएमएच रुग्णालय आहे. या रुग्णालयात शहरातून जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागातून रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयामध्ये अनेक विभाग उपलब्ध असून, अल्पदरात उपचार केले जातात. यापूर्वी 15 खाटांच्या क्षमतेचा एकच आयसीयू असल्याने रुग्णांचे हाल होत होते. गेल्या महिन्यात नव्याने 18 खाटांच्या बेडच्या दुस-या वॉर्डची उभारणी केली आहे. लवकरच 25 खाटांचा तिसरा अतिदक्षता विभाग सुरू होणार आहे. सध्या रुग्णालयातील दोन अतिदक्षता विभाग सुरू आहेत. तिस-या विभागाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या आयसीयूच्या वॉर्डमुळे चिंताजनक रुग्णांवर रुग्णालयात उपचार करणे सोईचे होणार आहे.

याबाबत बोलताना वायसीएमएच रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव म्हणाले, ”वायसीएमएच रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त असते. नवीन अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. तिस-या आयसीयूचे काम थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होईल”

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: