BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: राष्ट्रवादी काँग्रेसमधील जाणत्या कार्यकर्त्याने पार्थ पवारांना दिला ‘हा’ सल्ला

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पवार घराण्याला म्हणजेच शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना कमीपणा येईल, असं कोणतेही कृत्य करू नका, असा मौलिक सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसमधील जाणत्या कार्यकर्ते तुकाराम धनावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार पार्थ यांचे कान टोचले. तसेच लोकांमध्ये मिसळा, लोकांची कामे करा, ते तुम्हाला नक्कीच खासदार करतील पण, तेव्हा आम्हांला विसरू नका, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थ पूत्र आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून ते लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचार, सभा बैठका सुरु आहेत. पार्थ यांनी रविवारी वाकड परिसरातील आयटी अभियंते, निवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.

तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पाठीशी आजोबा, दादा आणि ताई आहेत. मी दिलेला शब्द पाळला नाही. तर, या तिघांकडून मला सटके भेटणार आहेत. अशी साद घालत पार्थ यांनी भावनिक आवाहन केले. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम धनावडे यांनी पार्थ यांचे कान टोचले. पवार घराण्याला म्हणजेच पवार साहेब, अजित आणि सुप्रिया यांना कमीपणा येईल, अस कोणतेही कृत्य करू नका. लोकांमध्ये मिसळा लोकांची कामे करा, ते तुम्हाला नक्कीच खासदार करतील. पण, तेव्हा आम्हाला विसरू नका, असा मौलिक सल्लाही दिला.

HB_POST_END_FTR-A4

.