Pimpri: ….अशी आहे ‘सभागृह नेता’ निवडीची प्रक्रिया

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नवीन सभागृह नेता निवडण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेला आठ दिवसांचा कालावधी लागू शकतो.

सत्ताधारी भाजपचे 77 नगरसेवक आहेत. या 77 नगरसेवकांची एक बैठक घेण्यात येईल. या बैठकीत पक्षाचा गटनेता निवडला जाईल. त्याबाबतचा ठराव केला जाईल. नवीन गटनेता निवडीचा ठराव नगरसचिवांकडे देण्यात येईल. त्यानंतर नगरसचिवामांर्फत विभागीय आयुक्तांकडे या बदलाची माहिती दिली जाईल.

त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे गटनेता म्हणून नोंद होईल. त्याचे पत्र नगरसचिवांना मिळाल्यानंतर महापौर नवीन सभागृह नेत्याचे नाव जाहीर करतील. या प्रक्रियेला आठ दिवसांचा कालावधी लागू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.