Pimpri: कोरोनाचे रुग्ण सापडल्याने शहरातील ‘हे’ भाग आज ‘सील’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी, रहाटणी, चिखली, भोसरीतील धावडेवस्ती परिसरात आज (शुक्रवारी) पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे  महापालिकेने  या परिसरातील काही  परिसर सील केला आहे.

शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडतील. तो भाग महापालिकेकडून सील केला जातो. दापोडी, रहाटणी,  चिखली, भोसरी परिसरात आज पुन्हा कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

त्यामुळे बॉम्बे कॉलनी दापोडीतील (जामा मशिद दापोडी- कृष्णाई डेअरी-महादेव मंदिर- विठ्ठल तरुण मंडळ दापोडी गावठाण),

चिखलीतील  डेस्टिनेशन मेमोइर(डेस्टिनेशन मेमोइर सोसायटी हद्द भिंत- फिनो कॉर्नर- क्रिस्टल कॉर्नर),

रहाटणीतील शिवराजनगर  (गणपती मंदिर- रॉयल ऑरेंज कौंटी सोसायटी- आकाशगंगा फेज 2- कुणाल मेडिकल, आयुर्वेद-भाग्यलक्ष्मी स्टेशनरी-श्रीराम सुपर मार्केट-वेलकम किराणा स्टोअर्स- गणपती मंदिर),

भोसरीतील धावडेवस्ती  (गोविंदा सुपर मार्केट-कृष्णा कार डेकोर-वर्षा सिलेक्शन-रिझवान चिकन सेंटर- ज्ञानेश्वरी लेडीज टेलर्स- शुभम मोबाईल शॉपी- भैरवनाश शाळा- गोविंदा सुपर मार्केट)  हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.

या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.