Pimpri: शहरातील ‘हा’ भाग ‘क्लस्टर कंटेनमेंट’ झोन घोषित; पुढील आदेशापर्यंत सील

This part of the city was declared a cluster containment zone; Seal until further notice :'अ' क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील काही भागातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी आणि आणि संभाव्य सामुदायिक प्रसार (कम्युनिटी ट्रान्समिशन) चा धोका टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील काही भाग ‘क्लस्टर कंटेनमेंट’, ‘बफर’ झोन घोषित केला आहे. त्यात संभाजीनगर, शाहूनगर, लिंकरोड, भाटनगर, रामनगर, क्रांतीनगर, दत्तवाडी, गंगानगर, आकुर्डी गावठाण हा भाग पुढील आदेशापर्यंत ‘सील’ असणार आहे.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील काही भागातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आल्यानंतर तो संपूर्ण परिसर सील करण्यात येतो. हा परिसर ‘कंटेनमेंट’, ‘क्लस्टर कंटेनमेंट’, ‘बफर’ झोन म्हणून घोषित केला जातो.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील साई उद्यान, आरएच 90 शाहूनगर, संभाजीनगर ‘क्लस्टर’, तर शर्मा आईस्क्रीम-कस्तुरी मार्केट रस्ता-साई उद्यान रस्ता-संभाजीनगर बसस्टॉप- रामेश्वर मंदिर रस्ता- आंधा टिफीन- गौरी ग्रुप-एचडीएफसी एटीएम-अष्टविनाक विद्यालय हा परिसर ‘बफर’ झोन घोषित केला आहे.

मेट्रो पोलिटीअन दर्शन हॉल जवळ लिंकरोड-चिंचवड ‘क्लस्टर’, तर मेट्रो पोलिटिएन सोसायटी विंग बी ‘बफर’ झोन घोषित केला आहे. भाटनगर, रमाबाईनगर पिंपरी ‘क्लस्टर’ तर एसटीपी, वाल्मिकी चौक, बिल्डींग नंबर 16 पवना रिव्व्हर हा परिसर ‘बफर’ झोन घोषित केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

रामनगर चिंचवड ‘क्लस्टर’, तर परशुराम चौक-दातीर पाटील-संघवी केशरी रस्ता-ओडोर कंपनी-टाटा सर्व्हिस सेंटर-सेंट ॲ ण्ड्रास कॉर्नर-पीसीएमसी दुमजी टॉयलेट हा परिसर ‘बफर’ झोन घोषित केला आहे.

क्रांतीनगर आकुर्डी ‘क्लस्टर’ झोन आहे. तर, महाराष्ट्र बँक-पालखी कमान-विठ्ठलमंदीर-अक्सा मस्जीद-त्रिमुर्ती हॉल-लोकमान्य हॉस्पीटल परिसर ‘बफर’ झोन आहे. दत्तवाडी आकुर्डी ‘क्लस्टर’ तर पालखी कमान-कुटे वृंदावन-सेंट जॉर्ज चर्च-गणपती मंदिर-साई पुजा सोसायटी परिसर ‘बफर’ झोन घोषित केला आहे.

गंगानगर आकुर्डी गावठाण ‘क्लस्टर’ तर गंगाननग एसटीपी-निर्माण हाईट्स-म्हाळसाकांत चौक-आकुर्डी दवाखाना नाला हा भाग ‘बफर’ झोन घोषित केला आहे.

आनंदनगर चिंचवड ‘क्लस्टर’ तर महावीर चौक-बिग बाझार- कुपर कॉर्नर-चिंचवड स्टेशन पूल (मालधक्का) हा परिसर बफर झोन घोषित केला आहे. हा परिसर पुढील आदेशापर्यंत सील असणार आहे.

या परिसरातील बँकेच्या सर्व शाखा बंद ठेवाव्यात. केवळ एटीएम केंद्र कार्यान्वित ठेवावीत. परिसरातील नागरिकांना बाहेर पडणे आणि बाहेरील नागरिकांना या परिसरात येण्यास मनाई आहे. या परिसरातील नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.