Pimpri: कोरोनाचे रुग्ण सापडल्याने शहरातील ‘हे’ भाग आजपासून ‘सील’

'This' part of the city will be 'sealed' from today as corona patients are found

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रुपीनगर, काळेवाडी, काकडेपार्क, वाकड, पिंपळेसौदागर, भाटनगर परिसरात आज (सोमवारी) कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महापालिकेने या भागातील काही परिसर सील केला आहे.

शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडतील. तो भाग महापालिकेकडून सील केला जातो. रुपीनगर, काळेवाडी परिसरात आज पुन्हा कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या परिसरासह सांगवीचाही काही भाग सील केला आहे.

त्यामुळे ढोरेनगर जुनी सांगवीतील (राज मसाले-योगिता जनरल स्टोअर्स-ढोरेनगर लेन नंबर1- 2- जैन मंदिर-सुमनश्री अपार्टमेंट- आनंद सुपर मार्केट-शुभयोग मंगल कार्यालय),

सहयोगनगर-रुपीनगर येथील (ओंकार जनरल स्टोअर-बाजली प्रिंटर्स-नॅशनल गॅरेज-त्रिवेणीनगर रोड-अक्षय जनरल स्टोअर्स- गणेश इलेक्ट्रॉनिक्स),

हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या परिसरात प्रवेशबंदी लागू आहे. तसेच परिसरातून बाहेर पडण्यासही नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.