Pimpri: कोरोनाचे रुग्ण सापडल्याने ‘हा’ भाग आजपासून ‘सील’

'This' part will be 'sealed' from today as corona patients are found

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड मधील काही भाग आणि काळेवाडीतील काही भाग महापालिकेने  सील करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवारी रात्री 11 पासून हा भाग बंद केला जाणार आहे.

शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडतील. तो भाग महापालिकेकडून सील केला जातो.   प्रेस्टिंग बिल्डिंग चिंचवड येथील (काकडे रेसिडन्सी- परफेक्ट वॉर सर्व्हिसेस-मुंबई-पुणे हायवे रोड-मॉडर्न सायकल कंपनी),

पवनानगर, काळेवाडीतील (पवनानगर लेन नंबर 4 – पवनाननगर लेन नंबर 1- कोकणरत्न मित्र मंडळ-निकिता जनरल स्टोअर)  हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.

या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.