Pimpri : शरद पवार यांनी शेअर केलेला ‘हा’ व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय

एमपीसी न्यूज – कोरोना सध्या सर्व जगात प्रचंड धुमाकूळ घालत आहे. यावर उपाययोजना म्हणून राज्य सरकारने जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. कोरोनाशी लढाई जिंकायची असेल तर काही सवयी स्वतःला लावून घ्यायची गरज आहे. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे हात धुण्याची सवय. योग्य प्रकारे हात कसे धुवायचे तसेच हाताला सर्व ठिकाणी स्पर्श करत हात कशा पद्धतीने स्वछ करायचा याचे प्रात्याक्षिक देणारा ‘हा’ व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘हॅशटॅग वॉर अगेन्स्ट व्हायरस’ असे लिहून ‘मला आलेला हा व्हिडिओ माहितीपूर्ण व उपयुक्त आहे. तो तुम्हीही पहा आणि पुढे पाठवा’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये हात धुताना सरळ, हाताची उलटी बाजू, तळवा, अंगठा, बोटांच्या मध्ये आणि मनगट स्वछ धुवून घ्यावे, असे दाखवण्यात आले आहे. खूप लोकांनी हा व्हिडिओ शेयर केला असून, एकदा अवश्य बघाच.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.