BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापालिकेतर्फे आषाढीवारीतील दिंडी प्रमुखांना यंदा मृदुंगाची भेट

नगरसेवकांच्या मानधनातून होणार खर्च; सुमारे 18 लाख 75 हजार रुपये खर्च येणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आषाढीवारीत सहभागी होणा-या 750 दिंडी प्रमुखांना यंदा मृदुंग भेट दिला जाणार आहे. त्याकरिता येत्या दोन दिवसांत 750 मूदुंगांची खरेदी केली जाणार आहे. नगरसेवकांच्या मानधनातून हा खर्च केला जाणार आहे. महापालिकेच्या वतीने दिल्या जाणा-या भेटवस्तूच्या परंपरेत खंड पडू नये, याकरिता हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली. तसेच दुष्काळ निधीला देखील मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांच्या उपस्थित आज (बुधवारी) झालेल्या बैठकीत दिंडीप्रमुखांना मृदुंग भेटवस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा शहरातून जातो. पालखीतील दिंडीप्रमुखांना महापालिकेतर्फे भेटवस्तू दिली जाते.

यंदा दिंडीप्रमुखांना मृदुंग भेट दिला जाणार आहे. या मृदुंगाच्या एका नगाची किंमत अंदाजे अडीच हजार असून, असे 750 नग मृदुंग येत्या दोन दिवसांत खरेदी केले जाणार आहेत. त्याकरिता सुमारे 18 लाख 75 हजार रुपये खर्च येणार आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मानधनातून हा खर्च केला जाणार आहे, असेही महापौर जाधव यांनी सांगितले. तसेच मृदुंग खरेदीतून शिल्लक राहिलेली रक्कम आणि इतर बाबींमधून जमा होणारी रक्कम अशी एकत्रित रक्कम दुष्काळ निधीला दिला जाणार आहे. ही रक्कम समाधानकारक असेल, असेही ते म्हणाले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3