Pimpri: ‘त्या’ डॉक्टरांना दवाखान्यामध्ये कामकाजासाठी नियुक्त करा

नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

एमपीसी न्यूज – वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेल्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविताना अडथळा निर्माण होतो. परंतु असे असतांनासुद्धा वैद्यकीय विभागामध्ये मानधनावरील दोन डॉक्टर केवळ बैठकांना उपस्थित राहण्याकरिता व इतर अवांतर कामकाजासाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्यांना तत्काळ दवाखान्यामध्ये कामकाजासाठी नियुक्त करावे, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

या दोन डॉक्टरांचा दोन ते तीन वर्षांपासूनचा कामकाजाचा अहवाल तपासावा. केवळ बैठकींना उपस्थित राहणे. किरकोळ कार्यालयीन कामकाज पाहणे याव्यतिरिक्त कोणतेही कामकाज करण्यात आलेले नाही. महापालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता. या डॉक्टरांना दवाखान्यामध्ये कामकाजासाठी नियुक्त करावे.

डॉक्टर हा रूग्णांच्या सेवेकरिता असतो. त्याने रुग्णसेवा हेच आपले परम कर्तव्य समजले पाहिजे. डॉक्टर हा केवळ बैठका करत राहिला. तर, रुग्णांची सेवा कोण करणार ? महापालिकेच्या रुग्णालयात असलेली डॉक्टरांची कमतरता. त्यामुळे मानधनावरील नियुक्त्या करून सुद्धा त्यांना केवळ बैठका आणि इतर कामकाज पाहण्यासाठीच नियुक्त करण्यात आले आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.