Pimpri: घुसखोरांविरोधातील ‘महामोर्चा’ला शहरातील हजारो ‘मनसैनिक’ जाणार

एमपीसी न्यूज – पाकिस्तानी, बांगलादेशातील घुसखोरांविरोधात उद्या (रविवारी) मुंबईत मनसेच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पिंपरी-चिंचवड शहरातून हजारो मनसैनिक जाणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत घुसखोरांविरोधातील मोर्चा काढण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग आहे. पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर या देशातून हाकलले पाहिजे. यासाठी ‘महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उद्या होणाऱ्या मुंबईमधील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शहरातून हजारो मनसैनिक मोर्चासाठी सकाळी सात वाजता मुंबईकडे रवाना होणार असल्याचे चिखले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.