Sangvi : मधुमेह मुक्तीच्या प्रचारासाठी आयोजित ‘थ्रीडी वॉकेथॉन’ला पिंपरी-चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद(क्षणचित्रे)

एमपीसी न्यूज – मधुमेह मुक्तीच्या प्रसारासाठी तसेच स्वस्थ आणि निरोगी स्वास्थ्यासाठी काढलेल्या थ्रीडी वॉकेथॉनला पिंपरी-चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे सात हजार नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. दीक्षित डाएटचे उद्गाते सो. श्रीकांत जिसकर यांच्या 65 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे, डॉ. वेदा नलावडे, प्रा. दीपक येवले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव, नगरसेवक अमित गावडे आदी उपस्थित होते. कोकणे चौक-कल्पतरू चौक-कोकणे चौक या पाच किलोमीटरच्या मार्गावर हा वॉकेथॉन झाला.

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी मधुमेहमुक्त आणि कोलेस्ट्रॉलमुक्त भारतासाठी डॉ. दीक्षित डाएट (थ्रीडी) ही संकल्पना राबवली आहे. मात्र, दीक्षित डाएट ही संकल्पना डॉ. दीक्षित यांच्या नावाने सर्वत्र प्रसारित होत असली तरी याचे उद्गाते डॉ. श्रीकांत जिसकार यांची आहे. त्यांचे 2004 असली अपघाती निधन झाले. त्यांनी सुरु केलेल्या  डाएटची माहिती 2013 मध्ये डॉ. दीक्षित यांना मिळाली. त्यांनी त्याप्रमाणे सुरुवातीला स्वतः प्रयोग केला. त्यामध्ये त्यांना सकारात्मक परिणाम मिळाले. त्यामुळे त्यांनी या डाएटचा सर्वत्र प्रसार करण्याचा निर्णय घेतला.

डॉ. दीक्षित डाएट (थ्रीडी) वॉकेथॉनच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत जिसकार यांना या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम जगभरातील बहुतांश देशांमध्ये आयोजित केला जातो. भारतात बेंगलोर, पुणे, सांगली यांसाख्या शहरात देखील आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मधुमेह मुक्तीसाठी जनजागृती करण्यात येते. मधुमेह झाल्याने खचून गेलेल्या नागरिकांना दीक्षित डाएटची माहिती देऊन नवी उमेद दिली जाते.

थ्रीडी वॉकेथॉनमध्ये सात हजारपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. सर्व सहभागींना टी शर्ट, टोपी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. सुरुवातीला उपस्थितांना दीक्षित डाएटची माहिती देण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणाम आणि बदललेल्या जीवनशैलीबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी योगा केला. योगा झाल्यानंतर आयुक्तांनी वॉकेथॉनला झेंडा दाखवला. पाच किलोमीटरच्या वॉकेथॉननंतर झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले. एकंदरीत नागरिकांच्या जीवनात सकारात्मकता भरण्यासाठी हा कार्यक्रम पोषक ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.