Pimpri : तरुणीची छेड काढत पोलीस तक्रार न करण्याची दिली धमकी

एमपीसी न्यूज – तरुणीचा पाठलाग करत (Pimpri) तिची छेड काढली व पोलीसात तक्रार दिली तर सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.1) सकाळी पिंपरीतील नेहरुनगर येथे घडला.

याप्रकरणी पिंपरी पोलीसात 18 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली असून मंगेश अचूत राऊत (रा.भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांची 228 वी जयंती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये साजरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा पाठलाग करून आरोपीने फिर्यादीचा हात धरला तिच्याशी गैरवर्तन केले. यावेळी फिर्यादीने त्याला विरोध केला असता तू पोलीस कम्प्लेंट करायची नाही, तुला सोडणार नाही, पोलीस माझ काही नाही करू शकत अशी धमकी दिली. यावरून पिंपरी पोलीस (Pimpri) ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.