pimpri: नगरसेवकाची महिला कनिष्ठ अभियंत्याला कार्यालयात बोलावून शिवीगाळ, धमकी

नगरसेवकावर कायदेशीर कारवाईची ज्यु. इंजिनिअर्स असोसिएशनची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी महिला कनिष्ठ अभियंत्यांना खासगी कार्यालयात बोलावून घेऊन असभ्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली. स्थापत्य विषयक कामावरुन अरेरावीची भाषे वापरल्याचा आरोप करत नगरसेवक शेख यांच्यावर कादेशीर कारवाईची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका ज्यु. इंजिनिअर्स असोसिएशने केली आहे. दरम्यान, आपण महिला कनिष्ठ अभियंत्याला शिवीगाळ केली नसल्याचे नगरसेवक शेख यांनी सांगितले.

याबाबत इंजिनिअर्स असोसिएशने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महिला कनिष्ठ अभियंता पल्लवी सासे व अनिल काशिद यांना प्रभाग क्रमांक चौदाचे नगरसेवक जावेद शेख यांनी सोमवारी (दि.16) सकाळी त्यांच्या खासगी कार्यालयात बोलावून घेत प्रभागामध्ये चालू असलेल्या स्थापत्य विषयक विकासकामांबाबत विचारणा केली. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अरेरावीच्या भाषेत कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर असभ्य भाषेत शिवीगाळ केली. शहराच्या प्रथम नागरिक महिला असूनही देखील नगरसेवकांकडून महिला अधिकाऱ्यांना अशा प्रकारची वागणूक देणे ही लाजीरवाणी घटना आहे.

मागील वर्षी देखील पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सुशील लवटे यांच्या चेहऱ्यास शेख यांनी काळे फासून त्याची ‘व्हिडीओ क्लिप’ सोशल मिडीयावर शेअर केली होती. शेख यांच्याकडून अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनामार्फत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. नगरसेवकांनी अभियंत्यांना कार्यालयामध्ये बोलावून अशा प्रकारे वागणूक देणे, शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ करणे अत्यंत चुकीचे आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी खासगी कार्यालयात, निवासस्थानी बोलावू नये. त्याबाबत प्रशासनाने आदेश निर्गमित करण्याची मागणीही त्यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत नगरसेवक जावेद शेख म्हणाले, ”महिला कनिष्ठ अभियंत्याना शिवीगाळ केलेली नाही. त्यांनी पुरावा दाखवावा. त्यांना कामाचा कंटाळा आहे. खड्डे बुजविले जात नाहीत. मनमानी पद्धतीने काम करतात. त्या महापालिकेच्या पैशांचा अपव्यय करत आहेत. नागरिकांसाठी आमची तळमळ असून, रागाच्या भरात मोठ्या आवाजात बोललो असेल. परंतु, शिवीगाळ केली नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.