Pimpri : बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक; खंडणी दरोडा पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 60 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाने निगडी परिसरात केली.

ओंकार रमेश हिंगे (वय 19, रा. शिवतेजनगर, बिबेवाडी), मंगेश दामु मांजरे (वय 20, रा. ओटा स्कीम, निगडी) आणि मनिष माधव निदानिया अशी अटक आरोपींची नावे आहेत.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निगडी परिसरात गस्त घालत असताना त्यांना ओटा स्कीम येथील विवेकानंद शाळेजवळ एक जण संशयीतरित्या उभारला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचत एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिंवत काडतुस असा ऐवज मिळाला. त्याच्याकडे तपास केला असता त्याने आणखी एक पिस्टल त्याचा मित्र मंगेश याने घेतल्याचे सांगितले. मंगेश याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले. दोघांनी चार महिन्यापूर्वी मनिष निदानिया याच्याकडून पिस्टल विकत घेतल्या होत्या. पोलिसांनी याप्रकरणात एकूण 60 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-निरीक्षक पुरुषोत्तम चाटे, विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, अशोक दुधवणे, शरिफ मुलानी, गणेश कोकणे, किरण खेडकर,विक्रांत गायकवाड, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, प्रवीण माने यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.