Pimpri: शहरात कोरोनाचे तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’! (Video)

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केलेल्या पाच संशयितापैंकी तीन पुरुष रुग्णांच्या द्रावाचे नमुने ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. परंतु, कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आले नाहीत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुढील 14 दिवस वायसीएम रुग्णालयातील विलगीकरण कक्षात निगराणी खाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. तसेच नागरिकांनी ‘कोरोना’संदर्भातील माहितीसाठी सारथी हेल्पलाईनच्या 8888006666 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

दुबईतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या तीन रुग्ण आणि संशय आल्याने स्वत:हून दोघे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी दुबईवरुन आलेल्या तीन पुरुषांचे अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, दोघांचे अहवाल निगेटीव्ह आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाबाधितांची नावे गोपनीय ठेवण्यात यावीत. त्यांच्या कुटुबियांची माहिती प्रसारित करु नये, असे आवाहन करत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोना बाधितांच्या चारतासापेक्षा जास्त संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांच्या नमुण्यांची तपासणी सुरु केली आहे. परदेशातून शहरात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष सज्ज केला आहे. तर, सात खासगी रुग्णालयात 60 आयसोलशन बेड उपलब्ध केले आहे. भोसरीतील रुग्णालयात 60 खाटांचे विलगीकरण कक्ष तयार केला जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु केली असून आज संध्याकाळपर्यंत 40 खाट तयार केले जातील. उर्वरित खाट उद्या केले जातील. याशिवाय पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात 60 खाट तयार आहेत. त्यातील 20 खाटांचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.

नागरिकांनी घाबरुन न जाता वैयक्तीक काळजी घ्यावी. हस्तांदोलन टाळावे, खोकताना तोंडाला रुमाल धरावा. सर्दी, खोकल्याचे लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सुचनांनुसार तपासणी करुन घ्यावी, खोकला, सर्दी असल्यास घरात बंदिस्त रहावे. नागरिकांनी कोरोनासंदर्भातील माहितीसाठी सारथी हेल्पलाईनच्या 8888006666 या क्रमांकावर संपर्क साधावा.

_MPC_DIR_MPU_II

तसेच राज्य सरकारच्या 104 या हेल्पलाईनवर देखील माहिती मिळेल. मास्क कोणी वापरायाचा हे वैद्यकीय विभागाने निश्चित केले आहे. त्यामुळे वैद्यकीय सल्यानुसारच मास्कचा वापर करावा. तंदुरुस्त असणा-यांनी मास्कचा वापर करणे टाळावे, असेही आयुक्त हर्डीकर म्हणाले.

  • महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द
    महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यापुढे महापालिका एकही सार्वजनिक कार्यक्रम घेणार नाही. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येणारे खासगी कार्यक्रम पुढे ढकलावेत. कार्यक्रम घेऊ नयेत, असे आवाहनही आयुक्तांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री पत्रकार परिषदेत माहिती दिलेले आणखी तीन पॉझिटीव्ह रुग्ण हे पिंपरी-चिंचवडमधील होते, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या 11 कायम आहे. आज (गुरुवारी) संध्याकाळी संध्याकाळी 5.30 वाजे पर्यंत पुणे शहरातील पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी साांगितले.

संबंधित आणखी बातम्या वाचा –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1