Pimpri: च-होलीतील आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; दिवसभरात सहा नवीन रुग्ण

कोरोनाबाधितांची संख्या 193 वर; 111 जणांची कोरोनावर यशस्वी मात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील च-होली परिसरातील आणखी तिघांचे आज (मंगळवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळीच च-होलीतील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. दिवसभरातच-होलीतील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, सक्रिय रुग्णांची संख्या 52 वर गेली आहे. शहरातील आणि शहराबाहेरील अशा 193 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर, 111 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. नऊ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोमवारी (दि. 11) शहरातील 197 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’ आणि ‘नारी’कडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सायंकाळी आले आहेत.

त्यामध्ये च-होली परिसरातील 33 वर्षीय पुरुष आणि 24, 54 वर्षीय दोन महिला अशा तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, सकाळीच च-होलीतीलच तीन वर्षाचा मुलगा आणि 25 आणि 28 वर्षीय दोन महिला असे तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. तर, पुण्यातील नायडू आणि औंध रुग्णालयात उपचार घेणारे दिघी, पिंपळेनिलख परिसरातील दोघे आज कोरोनामुक्त झाले आहेत.

महापालिका रूग्णालयात सक्रिय 52 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, पुण्यातील रहिवासी पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेले आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अशा 193 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर, 111 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

  • आजचा वैद्यकीय अहवाल!
    #दाखल झालेले संशयित रुग्ण – 54
    # पॉझिटीव्ह रुग्ण – 06
    #निगेटीव्ह रुग्ण – 142
    #चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 128
    #रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 182
    #डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 144
    #आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 193
    # सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 52
    # शहरातील कोरोना बाधित सात रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
    # आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 9
    #आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 111
    # दैनंदिन भेट दिलेली घरे – 16150
    #दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 47819

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.