Pimpri: टायगर ग्रुपच्या वतीने पोलिसांना ‘फेस शिल्ड’ वाटप

Pimpri: Tiger Group distributes 'Face Shield' to police

एमपीसी न्यूज – टायगर ग्रुप शाखा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आज पिंपरी, कुदळवाडी, साने वस्ती आणि चिखली पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलिसांना ‘फेस शिल्ड’चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी टायगर ग्रुपचे सिस्टीम हेड राहुल शिंदे, किरण तरंगे, संदीप थोरात, मनोज होरे , मंगेश पाटील, रेखा मॅडम, आणि अभिलाषा यांच्या हस्ते ‘फेस शिल्ड’चे वाटप करण्यात आले.

कोरोना या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी यांच्या बरोबर सफाई कामगार तसेच पोलीस कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. या कठीण प्रसंगात जीवाची बाजी लावून हे कर्मचारी नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर 24 तास कर्तव्य बजावत आहेत या पोलीस कर्मचार्यांचे कोरोना पासून बचाव करण्यासाठी टायगर ग्रुपच्या वतीने ‘फेस शिल्ड’चे  वाटत करण्यात आले.

पोलीस बजावत असलेल्या जबाबदारी बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असे मत टायगर ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.