BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: जलपर्णी काढण्यास टाळाटाळ; ठेकेदाराला महापालिकेच्या दोन नोटीसा

208
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास ठेकेदाराकडून टाळाटाळ केली जात आहे. आरोग्य विभागाने नदीपात्राची पाहणी केली असता जलपर्णी दिसून येत आहे. ठेकेदाराला नोटीस दिली आहे. चार दिवसात दोन वेळा नोटीस बजाविण्यात आली असून सात दिवसात जलपर्णी काढण्याबाबत कारवाई करावी. अन्यथा, कायदेशीर कारवाई करण्याची तंबी दिली आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्या वाहतात. पवना नदीचे पात्र 24 किलोमीटर, इंद्रायणीचे 19 आणि मुळा नदीचे 10 किलोमीटर इतके आहे. मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. जलपर्णीचा विळखा कायम आहे. त्यामुळे सांगवी, बोपखेल, वाकड, कस्पटेवस्ती परिसरातील रहिवाशांना डासांचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. शहरातून वाहणार्‍या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीपात्रात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचते. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील रहिवशांना डास तसेच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

  • मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम बंद आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नदीपात्राची पाहणी केली. त्यावेळी ठेकेदारामार्फत नदीपात्रातील जलपर्णी काढली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजाविली आहे. सात दिवसात जलपर्णी काढण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत बोलताना महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”पवना आणि इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे. मुळा नदीपात्राची पाहणी केली असता जलपर्णी काढलेली दिसून येत नाही. जलपर्णी काढून दररोज ‘मेंटेन’ करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या पाहणीनुसार संपुर्ण नदीपात्रात जलपर्णी दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला नोटीस दिली आहे. सात दिवसात कारवाई करण्यात यावी अन्यथा, कायदेशीर कारवाई केली जाईल. मुळा नदीतील जलपर्णी काढण्याची 19 लाखाची निविदा आहे. जुनपर्यंत त्याची मुदत आहे. ठेकेदार पाऊस पडण्याची वाट बघतात. पाऊस पडल्यावर जलपर्णी वाहून जाते. जलपर्णी न काढता फुकटचे पैसे घेतात. त्यामुळे पावसाळ्या अगोदर संपूर्ण जलपर्णी काढण्यात येणार आहे.”

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3