pimpri: शहरात 1580 नागरिक ‘होम क्वारंटाईन’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आजपर्यंत पाच लाख 89 हजार 513 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. तर, परदेशातून आलेलया 1580 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आज नवीन दोन रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे शहरात आता तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकुण 346 व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी आजअखेर 293 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, आज 40 व्यक्तींना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

तबलीग जमातच्या दिल्लीतील मर्कज येथून आलेले २३ नागरीक व त्यांचे 5 नातेवाईक अशा एकुण 28 जणांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. उर्वरित 26 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण टीमने शहरातील पाच लाख 89 हजार 513 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.