Pimpri: आजपर्यंत 561 पैकी 519 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

सात लाख नागरिकांचे सर्वेक्षण, 1846 होम क्वारंटाईन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आजअखेरपर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या 561 पैकी 519 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, 42 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.  1846 होम क्वारंटाईन असून महापालिकेने सात लाख 12 हजार 902 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या नऊ आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 561 व्यक्तींचे कोरोनाकरीता घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आजअखेर 519  व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  तसेच आज (मंगळवारी) 32 संशयितांना वायसीएममध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

शहरातील कन्टेंनमेंट झोन मधील सात लाख 12 हजार 902  नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर, 1846 व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

शहरामध्ये आजपर्यंत एकुण 21 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. यापैकी 12 रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित 9 पैकी 8 रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल असून 1 रुग्ण हा दिनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे येथे दाखल आहे. वायसीएम रुग्णालयात दाखल असणा-या 8 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.

कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.