Pimpri : वाचकांच्या कपाळीचा टिळा होण्यासाठी चंदनासारखे झिजावे लागते – प्रा.तुकाराम पाटील

एमपीसी न्यूज – साहित्य ही शिदोरी आहे. ती गोपाळकाला म्हणून सर्वांनी खावी. आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात मी गेल्या 35 वर्षांपासून राहतो. या नगरीच्या साहित्य वाटचालीचा मी साक्षीदार आहे. आज या पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिक उत्तम काम करतात याचा आनंद आहे. कथा, कविता, गझललेखन करण्यासाठी अभ्यास करून झिजावे लागते, असे मत प्रा. तुकाराम पाटील यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, शब्दधन काव्यमंच आणि समरसता साहित्य परिषद या संस्थांचे वतीने नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील यांचा जाहीर सत्कार चिंचवड येथील क्रांतीतीर्थ चाफेकर वाड्यात ज्येष्ठ साहित्यिका विनिता ऐनापुरे यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारवंत गिरीश प्रभुणे होते. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ गझलकार बशीर मुजावर होते. शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, सुभाष चव्हाण, नंदकुमार मुरडे, नितीन हिरवे, नंदकुमार कांबळे, नितीन यादव, आय के शेख, कैलास भैरट, भाऊसाहेब गायकवाड, मुरलीधर दळवी, मनीषा पाटील, फुलवती जगताप, पी. बी. शिंदे, बाबू डिसोझा, आनंद मुळूक, मधूश्री ओव्हाळ, दिनेश भोसले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळासाहेब घस्ते यांनी भावपूर्ण स्वागतगीत सादर केले. कवयित्री मानसी चिटणीस यांनी प्रा. तुकाराम पाटील यांची गझल सादर केली. वर्षा बालगोपाल यांनी कसं काय पाटील बरं हाय का या काव्यातून प्रा.तुकाराम पाटील यांचा परिचय करून दिला. सर्व साहित्यिक संस्थांचे वतीने तुकाराम पाटील यांचा जाहीर सत्कार ज्येष्ठ साहित्यिक विनिता ऐनापुरे यांच्या हस्ते करण्यात आला.

शब्दधनचे अध्यक्ष सुरेश कंक, बशीर मुजावर, विनिता ऐनापुरे, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश प्रभूणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी केले. बहारदार सुत्रसंचलन कवी सुहास घुमरे यांनी केले. तर आभार समरसता साहित्य परिषद अध्यक्षा शोभा जोशी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.