Pimpri : विनयभंग करणाऱ्याला नातेवाईकांनी चोपला

एमपीसी न्यूज – घरात घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्याला नातवाईकांनी चांगलाच चोप दिला. ही घटना मंगळवारी (दि. 3) दुपारी चारच्या सुमारास बौद्धनगर पिंपरी येथे घडली.

हरि सोमनाथ गायकवाड (वय 40, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत 28 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 3) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, संशयित आरोपीनेही मारहाण करणाऱ्या दहा ते बारा जणांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा वेळोवेळी फिर्यादी महिलेचा पाठलाग करीत होता. शिट्टी वाजवून अश्‍लिल शेरेबाजी करीत असे. घराची कडी वाजविणे, फिर्यादी कपडे बदलत असताना खिडकीतून डोकावून पाहणे, अशाप्रकारे त्रास देत होता. मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास आरोपी पिडित महिलेच्या घरात घुसला आणि त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

यावेळी महिलेने आरडाओरडा केल्याने नातेवाईक जमा झाले. नातेवाईकांनी आणि फिर्यादी महिला यांनी आरोपी गायकवाड याला चोप दिला. यावेळी आरोपी हा नातेवाईकांना चावलाही. तसेच आपल्याला झालेल्या मारहाणीबाबत त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात दहा ते बारा जणांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.