Metro News : पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू व्हावे; ‘पीसीसीएफ’ने घेतली राज ठाकरे यांची भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रो मार्ग या (Metro News) मार्गाचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे  या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) च्या पदाधिका-यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरमचे राजीव भावसार, तुषार शिंदे, सूर्यकांत मुथियान आदी उपस्थित होते.  निगडी ते पिंपरी विस्तारित मार्ग  4.41 किलोमीटर आहे. यामध्ये तीन मेट्रो स्टेशन आहेत. चिंचवड, आकुर्डी व निगडी अशी तीन स्टेशन आहेत. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर  हे प्रकरण  केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. राज्य शासन 170 कोटीचा भार उचलणार आहे. त्याचप्रमाणे  केंद्र शासन व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उर्वरित भार उचलणार आहे.

Sangavi News : जुनी सांगवीतील चंद्रमणी चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर, नागरिक हैराण

पिंपरी ते निगडी विस्तारित मार्ग यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला. तर नंतर स्थायी समितीने सुद्धा यासाठी मंजुरी देण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 27 फेब्रुवारी 2019 ला निगडी पर्यंतच्या मेट्रोल हिरवा कंदील दाखवला होता. (Metro News) आताही मंजुरी अंतिम टप्प्यात असून केंद्राने लवकरात लवकर मंजुरी द्यावी. निगडी ते पिंपरी काम लवकर चालू व्हावे अशी विनंती ठाकरे यांना केली. या प्रकरणात मी लक्ष देऊन हे काम मार्गी लावू, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.