Pimpri: आज 680 नवीन रुग्णांची नोंद, 391 जणांना डिस्चार्ज, 12 मृत्यू

Today 680 new patients were registered, 391 were discharged, 12 died : सध्या 3262 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू

 एमपीसीन्यूज  – पिंपरी-चिंचवड  शहराच्या विविध भागातील 643 आणि  शहराबाहेरील 37 अशा 680 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली.  उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 391 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.  दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 11 हजार 681 वर पोहोचली आहे.

आज 12 जणांचा मृत्यू झाला आहे. निगडी, यमुनानगरमधील 80 वर्षीय वृद्ध, भोसरीतील 65 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव मधील 33 वर्षाचा युवक, खराळवाडीतील 60 वर्षीय पुरुष, चिंचवड मधील 51 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 49 वर्षीय पुरुष,  फुगेवाडीतील 74 वर्षीय वृद्ध, दापोडीतील 90 वर्षीय महिला,  निगडीतील 61 वर्षीय महिला,   वल्लभनगरमधील 76 वर्षीय वृद्ध महिला आणि  रुपीनगर येथील 61 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 11681  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 7090  जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 209 जणांचा तर शहराबाहेरील परंतू, महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 57 अशा 266 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3262 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 2917

# पॉझिटीव्ह रुग्ण – 680

#निगेटीव्ह रुग्ण – 2161

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 985

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3262

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 2616

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 11681

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3262

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 266

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 7090

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 26703

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 87866

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.